अहमदनगर- महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाने
बाजी मारली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार
संग्राम जगताप यांच्यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपला मतदान केले आहे. सेनेला सर्वाधिक जागा मिळूनही त्यांना सत्तेपासून दूर रहावे
लागले.
भाजप आणि राष्ट्रवादीच्या या
युतीवर शिवसेनेने आजच्या अग्रलेखातून टीका केली आहे. भाजप व राष्ट्रवादीचे हे लफडे जुनेच
आहे व आमचे कोणतेही अनैतिक संबंध नाहीत असे ते उगाच सांगत असतात. असा घणाघात
शिवसेनेने आजच्या सामना अग्रलेखातून भाजप
आणि राष्ट्रवादीवर केला आहे.
या पार्शवभूमीवर आता नितेश
राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनवर टीका केली आहे. ‘असंख्य नवरे बोलत असतील.. बायको
शिवसेने सारखी पाहिजे!! लफडी कळली तरी सोडत नाही.. जास्तच जास्त तर काय..एक
सामन्यातून अग्रलेख!! बाकी संसार सुरु!!’ अशा खोचक शब्दात राणे यांनी शिवसेनवर
टीका केली आहे.